सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 6 डिसेंबर 2017 (10:12 IST)

रिलायंस जीओचा दबदबा कायम

4G इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये रिलायंस जीओचा दबदबा कायम आहे.सप्टेंबर महिन्यात रिलायंस जीओचा डाऊनलोड स्पीड २१.९ एमबीपीएस होता. तर 3G मध्ये वोडाफोन अग्र क्रमावर आहे. त्याचा स्पीड २.९ एमबीपीएस होता.  दूरसंचार नियामक ट्राईच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहीतीनुसार 4G इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये सप्टेंबर महिन्यात रिलायंस जीओ नंबर १ कंपनी ठरली आहे.

गेल्या नऊ महिन्यापासून रिलायंस जीओने सतत अव्वल स्थानी आहे. ऑगस्टमध्ये जीओचा डाऊनलोड स्पीड १८.४ एमबीपीएस होता. तर 4G इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये वोडाफोन दुसऱ्या स्थानी होता. त्याचा डाऊनलोड स्पीड ७.५ एमबीपीएस होता. मात्र जीओसोडून इतर कंपन्या त्यात सातत्य राखण्यास काहीशा कमी पडल्या. कारण पुर्वीपेक्षा त्यांचा स्पीड काहीसा कमी पडला. सप्टेंबर महिन्यात वोडाफोनचा 3G इंटरनेट डाऊनलोड स्पीड २.९ तर आयडीयाचा २.५ आणि एयरटेलचा २.३ एमबीपीएस होता.