शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जून 2020 (14:43 IST)

रिलायन्स जिओने इलेक्ट्रॉनिक्सपासून ते कपड्यांपर्यंत, आकर्षक सवलतीत 4X लाभ सादर केला

यावेळी रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक अतिशय खास आणि आकर्षक ऑफर आणली आहे. नवीन आणि जुने दोन्ही ग्राहक काही निवडक योजनांसह या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. कंपनीने 4 एक्स बेनिफिट बाजारात आणला असून याअंतर्गत जूनमध्ये रिचार्ज केल्यावर वापरकर्त्यांना इलेक्ट्रॉनिक्स, कपडे आणि फुटवियर यावर भारी सूट मिळेल. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्मवर ही सवलत मिळू शकते. यासाठी कंपनीने Reliance Digital, AJIO, Trends आणि Trends Footwear शी भागीदारी केली आहे.
 
या योजनांवर 4X फायदे उपलब्ध असतील
रिलायन्स जिओच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, वापरकर्ते 249 किंवा त्याहून अधिक रिचार्ज करून 4X फायदे मिळवू शकतात. हे ऑफर फक्त जून महिन्यात केलेल्या रिचार्जवरच उपलब्ध होईल. याचा लाभ Reliance Digital, AJIO, Trends आणि Trends Footwearमधून खरेदी केल्यावर घेता येईल.
 
असा मिळेल ऑफरचा लाभ
रिलायन्स जिओ वापरकर्त्यांना 249 किंवा अधिक रिचार्ज करण्यासाठी कूपन मिळेल. रिलायन्स डिजीटल, एजेआयओ, ट्रेंड आणि ट्रेंड फूटवेअर या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्मवर वापरकर्ते हे कूपन वापरू शकतात. महत्त्वाचे म्हणजे की हे कूपन आपल्या MyJio ऐपवर क्रेडिट केले जाईल. विशेष म्हणजे कंपनीने देऊ केलेल्या 4X लाभाची सुविधा कंपनीच्या जुन्या आणि नवीन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
 
तसे, अलीकडेच रिलायन्स जिओने आपल्या वापरकर्त्यांना एक वर्षासाठी Disney+ Hotstar VIPची विनामूल्य सदस्यता जाहीर केली आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध आहे. डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपी वापरकर्त्यांना मूव्ही आणि टीव्ही तसेच मुलांची सामग्री देखील प्रदान करेल. तथापि, हे कधी दिले जाईल आणि कोणत्या योजना उपलब्ध असतील याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.