सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (18:29 IST)

फेसबुकमधील एक कमाल फीचर, काही मिनिटांत जाणून घ्या तुमचे खाते कुठे लॉग इन्ड आहे

facebook
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook लोक मनोरंजन करण्यासाठी आणि आपल्या आयुष्याशी संबंधित घटना, गोष्टी आणि फोटो शेअर करण्यासाठी करतात. जवळजवळ प्रत्येक घरात फेसबुकचे वापरकर्ते सापडतील. याच्या अतिवापरामुळे सायबर गुन्हेगारही यावर लक्ष केंद्रित करतात. तसेच लोकांची खाती हॅक करण्याचा प्रयत्न करत असतात. आज आम्‍ही सांगणार आहोत त्या मार्गाने तुम्‍हाला तुमच्‍या फेसबुक अकाऊंट कुठे आणि कोणत्‍या डिव्‍हाइसमध्‍ये लॉग इन केलेले आहे हे कळून येईल- 

जर तुम्हाला जाणवत असेल की तुमच्या फोन किंवा कॉम्प्युटर व्यतिरिक्त तुमचे फेसबुक खाते इतरत्र लॉग इन केले आहे, तर तुम्ही या सोप्या स्टेप्सद्वारे शोधू शकता-
 
सर्व प्रथम फेसबुक उघडा.
आता सेटिंग्जच्या पर्यायावर जा.
येथे क्लिक करताच तुम्हाला डाव्या बाजूला अनेक ऑप्शन दिसतील.
दुसऱ्या क्रमांकावर तुम्हाला 'Security and Login' चा पर्याय दिसेल. यावर क्लिक करा.
आता एक पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला 'Where You are Logged In' पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करताच दुसरे पेज उघडेल.
या पेजवर तुम्हाला तुमचे फेसबुक अकाउंट कुठे - कुठे लॉग इन केलेले आहेत आणि कोणत्या डिव्हाइसवर केलेले आहेत याची संपूर्ण माहिती मिळेल.
 
लॉग आउट करण्यासाठी हे करा- 
तुम्हाला कोणतेही संशयास्पद लॉगिन दिसल्यास अशा प्रकारे लगेच लॉग आउट करा.
 
ज्या पेजवर तुम्हाला डिव्हाइसेसची यादी मिळाली जिथे तुमचे पेज लॉग इन केलेले आहे, त्याच पेजवर त्या लिस्टच्या समोर असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा.
आता तुमच्या समोर log out चा पर्याय दिसेल.
एकत्र लॉग आउट करायचे असल्यास Log Out of All Session वर क्लिक करा.