मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 3 जुलै 2019 (15:03 IST)

देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे TikTok, चीनमध्ये पाठवण्यात येत आहे डाटा: शशी थरूर

भारतात TikTok ची लोकप्रियता केवढ्या प्रमाणात आहे, हे सांगायची गरज नाही. व्हाट्सएप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला टिकटॉकचे व्हिडिओ बघायला मिळतील. तसेच टिक टॉकविरोधात भारतात सतत प्रश्न उठत आहे. काँग्रेस नेते शशी थरूर ने देखील TikTok बद्दल लोकसभेत प्रश्न उचलला आहे आणि या देशाची सुरक्षा धोक्यात आहे असे देखील म्हटले आहे.  
 
लोकसभेत शशी थरूर यांनी म्हटले की TikTok एपच्या माध्यमाने भारतीय लोकांचा डाटा चीनमध्ये बेकायदेशीररीत्या पोहोचत आहे. अशात हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोक्याची बाब आहे. थरूर यांनी ही गोष्ट लोकसभेत सांगितली.  
 
त्यांनी म्हटले, ' स्मार्टफोन, एप्स, सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या काळात भारतीय यूजर्सचा डाटा सहजतेने मिळत आहे, ज्याचा वापर वैयक्तिक स्वार्थ, फायदा कमावण्यासाठी आणि राजनैतिक नियंत्रणासाठी केला जात आहे. नुकतेच अमेरिकेत टिकटॉकवर डाटा एकत्र करण्यावरून 5.7 मिलियन डॉलर अर्थात किमान 39 कोटी रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.' 
 
शशी थरूर यांनी बर्‍याच‍ रिपोर्टचे संदर्भ देत म्हटले आहे की या टिकटॉक व्हिडिओ एपच्या मार्फत चिनी सरकारकडे यूजर्सचा डाटा पोहोचत आहे. त्यांनी याला राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा सांगत म्हटले आहे की ते या बाबतीत सरकारशी निवेदन करतील की वैयक्तिकतेच्या अधिकारासाठी सरकारने ठोस कायदेशीर ढाचा तयार करायला पाहिजे.  
 
महत्त्वाचे म्हणजे काही महिन्या अगोदर भारतात टिकटॉकवर बॅन लावण्यात आले होते आणि याला गूगल प्ले-स्टोअर आणि ऍपल एप स्टोअरवरून देखील हटवण्यात आले होते. टिकटॉकवर आपत्तीजनक आणि मुलांचे अश्लील व्हिडिओजला बूस्ट मिळण्याचा आरोप लावण्यात आला होता. एका प्रकरणाच्या सुनवाई दरम्यान मद्रास हायकोर्टाने केंद्र सरकारला चीनचे पॉपुलर व्हिडिओ एप TikTok वर बॅन लावण्याचे निर्देश दिले होते आणि म्हटले होते की एप 'अश्लीलते'ला बढावा देत आहे.