शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 12 मे 2020 (20:52 IST)

ट्विटरसाठी कोरोना संदर्भात नवीन लेबल सुरु

ट्विटरने कोरोना संदर्भात नवीन लेबल सुरु करत असल्याची घोषणा केली. हे लेबल कोविड 19 म्हणजेच कोरोनाविषयी चुकीची माहिती देणाऱ्या ट्विटला मार्क करणार आहे. यामुळे ट्विटर युजर्सना कोरोनाबद्दलची अधिकृत माहिती कोणती आणि अनधिकृत कोणती हे समजण्यास मदत होणार आहे. 
 
कोरोनाबाबत दिशाभूल करणारी माहिती माध्यमांमध्ये विशेषकरुन समाज माध्यमांमध्ये पसरवली किंवा पसरली जाते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ट्विटरने आता लेबल सिस्टम तयार केली आहे.  हे लेबल प्लॅटफॉर्मच्या निवडक पेजशी लिंक असणार आहेत. याचबरोबर हे लेबल काही बाहेच्या विश्वासार्ह सुत्रांशीही लिंक असणार आहेत. यामुळे ट्विटद्वारे दावा केलेली माहितीच्या सत्यतेची पडताळणी होणार आहे.