सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019 (11:47 IST)

चीनचा मोठा निर्णय, 18 वर्षांखालील मुले ऑनलाईन गेम खेळू शकणार नाहीत

एक मोठा निर्णय घेत चिनी सरकारने 18 वर्षाखालील मुलांसाठी ऑनलाईन खेळांवर बंदी घातली आहे. चीन सरकारने ऑनलाईन गेम खेळण्यावर बंदी घालून असे म्हटले आहे की 18 वर्षाखालील मुलांना रात्री 10 ते सकाळी 8 च्या दरम्यान ऑनलाईन गेम खेळता येणार नाही. तसेच, शनिवार व रविवार आणि सुट्टीच्या कालावधीत ऑनलाईन गेमना केवळ तीन तास परवानगी दिली जाईल.
 
मुलांची तब्येत खराब होत आहे
व्हिडिओ गेमिंग आणि मोबाइलवर ऑनलाईन गेमिंगचे व्यसन मुलांमध्ये बर्‍याच समस्या निर्माण करीत आहे. बरीच मुले मानेच्या दुखण्याबद्दल तक्रार करतात आणि बर्‍याचजणांचे डोळे खराब होत आहेत. या व्यतिरिक्त मुलांना पाठदुखीच्या तक्रारी येत आहेत. सांगायचे म्हणजे चीन जगातील दुसर्‍या क्रमांकाचा गेमिंग मार्केट आहे, तर अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे.
 
ऑनलाईन गेम खेळण्याच्या खर्चावर देखील नियंत्रण 
चिनी सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, 8 ते 16 वर्षे वयोगटातील मुले ऑनलाईन गेमिंगसाठी दरमहा 200 युआन अर्थात सुमारे दोन हजार रुपये खर्च करू शकतात. त्याच वेळी, 16-18 वर्षांच्या मुलांना गेमसाठी 400 युआन म्हणजेच सुमारे चार हजार रुपये खर्च करण्याची परवानगी आहे. तसेच, ऑनलाईन गेम खेळण्यासाठी, मुलांना त्यांच्या वास्तविक नावांसह नोंदणी करावी लागेल.