गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 4 डिसेंबर 2018 (08:51 IST)

भारताला जागतिक प्रतिभा केंद्र बनवू इच्छितो : वन प्लस कंपनी

India a global talent center
महागडे स्मार्टफोन निर्माण करणारी वन प्लस कंपनी देशभरात इंजिनिअरिंगमध्ये मोठी भूमिका बजावून देशामध्ये नवकल्पना वाढवण्याची इच्छा व्यक्त करत आहे. कंपनी पुढील ३ वर्षात कंपनीचा भारतात सर्वात मोठा संशोधन आणि विकास केंद्र असेल. अलिकडेच कंपनीने हैदराबादमध्ये केंद्र स्थापन केले आहे. वन प्लस कंपनीची शेन्झेन, तैवान आणि अमेरिकेत अशीच केंद्रे आहेत. कंपनीची आर.एन.डी टीममध्ये ७०० लोकांचा समावेश आहे. वन प्लसचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पेटे लाऊ यांनी सांगितले की, 'आम्ही भारताला कंपनीसाठी जागतिक प्रतिभा केंद्र बनवू इच्छितो.' 
 
वन प्लस कंपनीने सांगितले की, 'हे विचार दीर्घकालीन दृष्टीकोनाचा भाग आहे. आम्हाला फक्त सर्वोत्कृष्ट प्रतिभा जोडुन त्यांना प्रशिक्षित करायचं आहे. त्याचबरोबर मोठया कालावधीसाठी भारताबरोबर काम करायचं आहे'. पुढील तीन वर्षात वन प्लस कंपनी मोठा संशोधन केंद्र उभारण्याची तयारी दाखवत आहे. 'सर्वोत्कृष्ट प्रतिभाच्याशोधासाठी आयआयटी सारख्या टॉप इंजिनियरिंग महाविद्यालयाच्या संपर्कात आहे.वर्तमानात त्यांचाकडे भारतातील आर अॅण्ड डी टीममध्ये १०० लोकांचा समावेश आहे.