गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 15 जुलै 2021 (23:53 IST)

WhatsAppने एका महिन्यात 20 लाखाहून अधिक खाती बंद केली, कारण काय आहे ते जाणून घ्या

whatsapp banned
एका महिन्यात 20 लाखाहून अधिक भारतीयांची खाती बंद झाल्याचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsAppने गुरुवारी सांगितले. त्यांनी आपल्या मासिक अहवालात ही माहिती दिली आहे. आयटी नियमांच्या अंमलबजावणीनंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे, कारण नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोशल मीडिया कंपन्यांना दरमहा कम्प्लयांस रिपोर्ट (Compliance Report) द्यावा लागणार आहे.
 
व्हॉट्सअॅपने आज जारी केलेल्या अहवालात 15 मे ते 15 जून दरम्यानचा डेटा आहे. व्हॉट्सअॅपनुसार या कालावधीत 20 लाख 11 हजार खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही खाती बंद करण्यात आली आहे.