गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019 (12:43 IST)

वर्षाच्या शेवटपर्यंत व्हाट्सएप आणेल पेमेंट सुविधा

व्हाट्सएपची पेमेंट सर्विस या वर्षाच्या शेवटपर्यंत लाँच होऊ शकते. व्हाट्सएप इंडियाने सांगितले की ते वर्षाच्या शेवटपर्यंत भारतात पेमेंट सर्विस आणण्याच्या तयारीत आहे. या सर्विसची 2017 पासूनच इनवाइट-ओन्ली बेसिसवर टेस्टिंग सुरू आहे.   
 
व्हाट्सएप इंडिया हेड अभिजित बोस यांनी सांगितले की आम्हाला उमेद आहे की वर्षाच्या शेवटापर्यंत ही सुविधा आम्ही युजर्सला देऊ. कंपनी आपल्या या  पेमेंट सिस्टमला व्हाट्सएप फॉर बिझनेस एपासोबत इंटीग्रेट करू शकते. व्हाट्सएप पेमेंट सर्विसला आधिकारिकरुपेण केव्हा लाँच करण्यात येईल अद्याप याची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही आहे.  
 
पेमेंटला बनवेल सोपे : व्हाट्सएप पेमेंट सिस्टममुळे यूजर्स आणि लहान व्यवसायात एपच्या मदतीने एनक्रिप्टेड पेमेंट होऊ शकतात. यासाठी या सर्विसला 'एंड-टू-एंड कम्युनिकेशन सायकल'सोबत अनेबल केले जाऊ शकते.