बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 11 मार्च 2020 (13:18 IST)

व्हॉट्सॲपमध्ये आणखी काही हटके फिचर येणार

व्हॉट्सॲपमध्ये यूझर्ससाठी आता मल्टीपल डिव्हाईस सपोर्ट, लास्ट सीन फॉर सिलेक्ट फ्रेंड्स तसेच आणखी काही फिचर्ससह हटके फिचर येणार आहेत. तर तपशीलवार जाणून घ्या यावर्षी आपले व्हॉट्सॲप चॅटिंग अधिक मनोरंजक कसे बनवणार आहे.
 
निवडक मित्रांसाठी नवे फीचर  
यूझर्स आपल्या गोपनीयतेसाठी लास्ट सीन ऑप्शन मध्ये 'Nobody' सिलेक्ट करून ठेवतात. त्यामुळे इतरांना आपण शेवटचे व्हॉट्सॲप कधी पाहिले याची माहिती मिळत नाही. तथापि, लवकरच आपण आपल्या निवडक मित्रांसाठी Last seen for select friends हा ऑप्शन निवडता येणार आहे. त्यामुळे निवडक मित्रांना Last seen पाहता येणार आहे. कंपनी या फीचरची चाचणी करीत आहे. हे फिचर येत्या काही आठवड्यांत रोलआउट केले जाईल. 
 
मल्टीपल डिव्हाइस फिचर 
आता व्हॉट्सअ‍ॅप यूझर्स एकाच डिव्हाईसवर अकाउंट ॲक्टिव्ह ठेवू शकतात. जेणेकरुन यूझर्स एक अकाउंट वेगवेगळ्या डिव्हाइसवर ऑपरेट करू शकतील. जे एकापेक्षा जास्त स्मार्टफोन वापरतात त्यांच्यासाठी याचा चांगला उपयोग होईल.
 
मेसेज डिसअपीअर 
व्हॉट्सअ‍ॅपचे आणखी एक फिचर्स मेसेज डिसअपीअर येणार आहे. यामुळे यूझर्स मेसेज डिलीट करण्यासाठी वेळ सेट करू शकतात. यासाठी युझर्सना 1 दिवस, 1 आठवडा, 1 महिना किंवा 1 वर्षाचा पर्याय मिळू शकेल. हे वैशिष्ट्य सध्याच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस प्रमाणे मिळेल अशी शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, व्हॉट्सएपची स्टेटस ऑटोमेटिक जाण्याची वेळ २४ तास आहे. 
 
चॅट बॅकअप 
व्हॉट्सॲप सध्या चॅक बॅकअप आणि सिक्युरिटी फीचरवर काम करत आहे. सध्या व्हॉट्सअॅप चॅट आयक्लाऊड किंवा गुगल ड्राईव्हवर सेव्ह होत आहेत.पण व्हॉट्सअ‍ॅपच्या एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे या बॅकअप फाइल्स सुरक्षित नाहीत. नवीन सुरक्षा वैशिष्ट्यांसह व्हॉट्सएप ही त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे फिचर आल्यानंतर यूझर्स क्लाउडवर बॅकअप घेण्यापूर्वी ते चॅट हिस्ट्रीला एनस्क्रिप्ट करू शकतील. 
 
फेस अनलॉक
व्हॉट्सअ‍ॅपला सध्या अँड्रॉइड डिव्हाईसवर फिंगरप्रिंट लॉक सपोर्ट आहे. या माध्यमातून युजर्स फोनच्या फिंगरप्रिंटद्वारे त्यांचे व्हॉट्सअॅप लॉक करु शकतात. आता कंपनी अँड्रॉइडसाठी नवीन सिक्युरिटी फेस अनलॉकची चाचणी घेत असल्याचे वृत्त आहे. IOS साठी व्हॉट्सॲपने हे वैशिष्ट्य गेल्या वर्षीच आणले आहे. लवकरच अँड्रॉइडवर येण्याचीही अपेक्षा आहे.