शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : बुधवार, 11 मार्च 2020 (12:49 IST)

काय दारूच्या सेवनामुळे कोरोना व्हायरसपासून बचाव होऊ शकतो... जाणून घ्या सत्य..

जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार असताना या दरम्यान शिवसेनेच्या मुखपत्र ‘सामना’ ची एक कटिंग सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यात दावा करण्यात आला आहे की दारूच्या सेवनामुळे कोरोना विषाणूपासून बचाव होऊ शकतो.
 
काय आहे व्हायरल -
“दारू पिणार्‍यांना नाही होणार कोरोना व्हायरस” कॅप्शनसह फेसबुक आणि ट्विटरवर ही न्यूजपेपर कटिंग शेअर केली जात आहे. यात एक आर्टिकल आहे, ज्याचं शीर्षक आहे- “अब कैसा रोना! एक पैग में पैक होगा कोरोना!”
 
यात लिहिले आहे की जर्मनीमध्ये झालेल्या एका शोधाप्रमाणे कोरोनाला अल्कोहलची अॅलर्जी आहे. जर हे व्हायरस अल्कोहलच्या संपर्कात येतं तर एका मिनिटात नष्ट होतं.
 
काय आहे सत्य-
हे आर्टिकल ‘सामना’ मध्ये 14 फेब्रुवारी, 2020 ला पब्लिश केले गेले होतं. आम्ही पूर्ण आर्टिकल वाचलं तर माहीत पडलं की आर्टिकलच्या शीर्षकामध्ये आणि सुरुवातीला दारू सेवन करण्यासंबंधी माहिती देण्यात आली आहे परंतू आर्टिकलमध्ये पुढे डिसइंफेंक्टेंट असा उल्लेख आहे. यात सांगण्यात आले आहे की जागतिक आरोग्य संघटनाने (WHO) जगभरात सल्ला दिला आहे की कोरोना व्हायरसपासून बचावासाठी लोकांना सतत अल्कोहलने हात धुणे फायदेशीर ठरेल.
 
म्हणून आम्ही WHO द्वारा जाहीर गाइडलाइन्स वाचल्यावर WHO द्वारे कोरोना व्हायरसपासून बचावासाठी अल्कोहलची भूमिका असल्याचा उल्लेख आढळला परंतू सेवन करण्याचा सल्ला नाही. जेव्हाकि WHO द्वारे सल्ला देण्यात आला आहे की लोकांनी अल्कोहल आढळणार्‍या हँडवॉश आणि हँड रब वापरावं.
वेबदुनिया तपासणी दारूच्या सेवनामुळे कोरोना व्हायरसचा धोका टळतो हा दावा फेक असल्याचं आढळलं. WHO प्रमाणे, कोरोना व्हायरसपासून बचावासाठी लोकांनी अल्कोहलिक हँडवॉश आणि हँड रब वापरावं.