गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 3 मार्च 2020 (14:56 IST)

सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना आता थेट 3 वर्ष जेलची शिक्षा

सोशल मीडियावर खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली जाणार आहे. या कारवाईनुसार खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना तीन वर्ष जेलची शिक्षा भोगावी लागणार आहे. दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
सोशल मीडियामार्फत खोट्या बातम्या आणि अफवा पसरवून दोन समाजांमध्ये वाद निर्माण करण्याच्या बऱ्याच घटना याअगोदरही घडल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर वादग्रस्त व्हिडीओ, फोटो किंवा लेख शेअर करणाऱ्यांवर आता थेट कारवाई होणार आहे.
 
खोट्या बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी नवी समिती आयोजित करण्या आली आहे. या समितीला शांतता आणि सद्भाव समिती असं नाव ठेवण्यात आलं आहे. ही समिती एका एजन्सीमार्फत खोट्या बातम्यांची आणि त्या पसरवणाऱ्यंची माहिती काढणार आहे. त्यानंतर आरोपींवर कारवाई केली जाणार आहे. खोट्या बातम्या किंवा अफवा पसरवणाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना समिती पाठिंबा देणार आहे. याशिवाय माहिती देणाऱ्यांना बक्षिसही दिलं जाणार आहे. त्यासाठी एक मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी जारी केलं जाणार आहे.