शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 14 ऑगस्ट 2019 (13:03 IST)

Whatsapp मध्ये येईल फिंगरप्रिंट लॉक/अनलॉक फीचर

इंस्टेंट मेसेजिंग एप व्हाट्सएप एंड्रॉयड उपयोग करणार्‍या लोकांसाठी लवकरच नवीन फीचर आणू शकतो.  व्हाट्सएप यूजर फिंगरप्रिंटच्या मदतीने व्हाट्सएपला लॉक आणि अनलॉक करू शकतील. ही माहिती व्हाट्सएपची माहिती देणार्‍या बीटा इंफो ने दिली आहे.
 
व्हाट्सएप बीटानुसार, व्हाट्सएप या फीचरला एंड्रॉयड बीटावर परीक्षण करत आहे. हे फीचर लेटेस्ट बीटा वर्जन 2.19.221 मध्ये उपलब्ध आहे आणि डिफाल्ट रूपेण डिसेबल आहे. अर्थात बीटा वर्जनमध्ये देखील तुम्हाला या फीचरला इनेबल करावे लागणार आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स आपले व्हाट्सएपला अधिक सिक्योर करू शकतील.  हा फीचर आयओएस उपयोगकर्तांसाठी आधीपासूनच उपस्थित आहे.
 
त्याशिवाय व्हाट्सएपचे नवीन बीटा वर्जनमध्ये शो कंटेंट इन नोटिफिकेशनचे विकल्प देखील मिळत, ज्यात युजर्सला या गोष्टीची आझादी मिळते की तो फिंगरप्रिंट इनेबल न असल्याच्या स्थितीत मेसेज हाईंड करण्यास इच्छुक आहे की नाही. जसे की आधी सांगण्यात आले आहे की व्हाट्सएप 2.19.221 वर्जनमध्ये हे फीचर डिफाल्ट रूपेण डिसेबल असून याला वापर करण्यासाठी इनेबल करणे आवश्यक आहे.
 
सेटिंगमध्ये करावे लागेल फेरबदल
यासाठी उपयोगकर्त्याला सर्वात आधी व्हाट्सएप सेटिंगमध्ये जावे लागणार आहे. येथे अकाउंटचा विकल्प मिळेल, ज्यावर क्लिक करून तुम्ही प्रायवेसीच्या विकल्पावर जाल. जेथे तुम्हाला फिंगरप्रिंट लॉक करण्याचा विकल्प मिळेल. जर तुम्ही तुमचा व्हाट्सएप अपडेट केला असेल तर हा विकल्प तुम्हाला दिसणार नाही. या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला किमान ड्रॉयड मार्शमैलो किंवा याच्या वरच्या एंड्रॉयड वर्जनची आवश्यकता असेल.