गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 25 मे 2021 (11:11 IST)

काय बंद होणार फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम?

व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबुक, (facebook) ट्विटर (twitter) आणि इंस्टाग्राम (Instagram) आपल्या डेटा प्रायव्हेसीमुळे चर्चेत आहे. आणि आता हे बंद होणार अशा चर्चेने जोर पकडला आहे. वस्तुतः 25 फेब्रुवारीला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नवीन नियमांचे पालन करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली, ज्याचा कालावधी 25 मे रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत येत्या दोन दिवसांत या अ‍ॅप्सवर बंदी येऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 
25 फेब्रुवारी 2021 रोजी केंद्र सरकारने भारतीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडून डिजिटल सामग्रीचे नियमन करण्यासाठी 3 महिन्यांच्या आत अनुपालन अधिकारी, नोडल अधिकारी इत्यादी नेमणूक करण्यास सांगितले होते. सरकारने दिलेल्या आदेशानुसार कंपन्यांना अनुपालन अधिकारी नियुक्त करावे लागतील आणि त्यांचे नाव व संपर्क पत्ता भारताचा असावा- यात तक्रारीचे निराकरण, आक्षेपार्ह सामग्रीचे निरीक्षण, अनुपालन अहवाल आणि आक्षेपार्ह सामग्री काढून टाकणे यासारख्या गोष्टी समाविष्ट आहेत.
 
या नव्या नियमानुसार एक समिती देखील तयार केली जाईल ज्यात संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, गृह मंत्रालय, माहिती प्रसारण मंत्रालय, कायदा, आयटी आणि महिला व बाल विकास विभागातील लोक असतील. त्यांना आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी ऐकण्याचा अधिकार असेल. नवीन नियमांमध्ये ग्रीवांस रीड्रेसल अर्थात 24 तासांच्या आत तक्रार प्राप्त झाल्याचे स्वीकारणे आणि 15 दिवसांच्या आत आपल्या कार्यवाही किंवा कारवाई न करण्याची कारणे सांगणे समाविष्ट आहे.