बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 11 मार्च 2019 (10:56 IST)

यापुढे YouTube वर खोट्या बातम्या चालणार नाही, येत आहे नवीन फीचर

ऑनलाईन व्हिडिओ कंपनी Youtube ने सांगितले की ते चुकीची माहिती टाळण्यासाठी आणि लोकांना योग्य बातम्या पोहोचविण्यासाठी बातम्यांसंबंधित व्हिडिओसह ‘सूचना पॅनेल’ दर्शविणे सुरू करीत आहे. YouTube ने बोगस बातम्या कमी करण्यास याची सुरवात केली आहे. 
 
कंपनी प्रवक्त्याने सांगितले की Youtube वर चांगल्या बातम्यांसाठी आम्ही माहिती पॅनेल विस्तृत करीत आहोत. यामुळे कोणत्याही व्हिडिओला पात्र चॅनेलच्या सामग्रीशी जुळवून सत्यापित करता येईल. सध्या YouTube देशात इंग्रजी मध्ये ब्रेकिंग न्यूज आणि टॉप न्यूज फीचरची सुविधा देतो. या अंतर्गत देशात जेव्हाही एखादा मोठा कार्यक्रम होतो तेव्हा प्रमाणित वृत्त स्रोतांना प्राधान्य दिले जातात.
 
कंपनीने सांगितले की जेव्हा कोणताही वापरकर्ता हिंदी किंवा इंग्रजीत कोणत्याही बातमी संबंधित प्रामाणिकपणा तपासू इच्छित असेल तेव्हा माहिती पॅनेल उपलब्ध राहील. त्या अंतर्गत YouTube कोणत्याही संबंधित सामग्रीला एका पात्र चॅनेल सामग्रीशी मिळून घेईल. प्रवक्त्याने सांगितले की हा फीचर सर्वात प्रथम भारतात सादर केला जात आहे. नंतर ते इतर देशांमध्ये देखील उपलब्ध केले जातील.