Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पूर्णपुरूष श्रीकृष्ण

Updated: मंगळवार, 20 ऑगस्ट 2019 (11:08 IST)
इंद्राच्या कोपापासून गावकर्‍याना वाचवणारा गिरीधर कितीतरी युक्ती प्रयुक्तींनी अज्ञानात असलेल्या त्या गोपजनांना जगण्याचं सार सोप्या भाषेतून, कृतीतून पटवून देतो. बायकांची ताक, दुध, लोणी या सारख्या साध्या ऐहिक गोष्टींवर असलेली आसक्ती सोडवण्यासाठी तो त्यांच्या घरचे लोणी, दूधदुभते चोरतो, मटकी फोडतो.

नंद राजाचा मुलगा असूनही त्याला या सगळ्या गोष्टी काय मिळत नसतील? पण आपल्याजवळच आपलं प्रिय इतरांनाही वाटावं, कोणी उचनीच असू नये सर्वांनी मिळून मिसळून राहावं हे आजच्या काळातलं 'समाजवादी' तत्वही श्रीकृष्णाने मांडलं. हे शिकवण्यासाठीच कृष्ण गोपालकाल्यापासून गवळणींच्या खोड्या करण्यापर्यंत सारी कृत्ये करत असावा.

  WD
आपल्या घर संसारात कष्ट करणाऱ्या गोपिकांना निखळ, शाश्वत आनंदाची प्राप्ती करून देवासाठी त्यांनी आपल्या मुरलीच्या नादाचे वेड लावले. रासक्रीडेत तर प्रत्येकीला कृष्ण पूर्णवेळ आपल्याशीच खेळत होता असे वाटत असे. ही अत्यानंदाची अनुभुती मिळणार्‍या त्या किती धन्य असतील?

कृष्णाने त्यांना सगुणावर प्रेम करायला शिकवलं हे मान्य. पण जी स्त्री संसारी कामकाजातच अडकली आहे. तिला तिच्या प्रिय अशा मुलबाळ गुर वासरं यापासून बाजूला नेऊन सगुणाचे का होईना ध्यान करावयास लावणे हे सोपे काम नव्हते. तो चतुर होता चाणाक्ष होता, कर्तव्यनिष्ठ होताच अन वेळ पडल्यास वज्राहूनही कठोर होणारा होता.

  WD
नरकासुराच्या ताब्यात असणार्‍या 16 हजार स्त्रियांशी लग्न करण्याचे धारिष्ट्य दाखवण्याचे सामर्थ्य फक्त कृष्णातच होते. कारण स्त्रीच्या अब्रूविषयी जिथे आजही 'काचेचे भांडे' वगैरे उपमांनी, तिच्या न केलेल्या चुकीमुळेही आयुष्यभर जिला दु:ख भोगावे लागते, त्यावेळी नरकासुराकडे इतके दिवस बंदिवान असणार्‍या स्त्रियांना तर त्यांच्या घरची दारे केव्हाच बंद झाली असतील? अशावेळेस त्यांच्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय राहिला असता का? म्हणूनच त्याने इतक्या स्त्रियांशी केलेला विवाह हा त्याचा भोगीपणा नसून त्यांना दिलेली जगण्याची संधी ठरते.

' कृष्णशिष्टाई' म्हणून प्रसिद्ध असणारे कृष्णाचे सभेतील वक्तव्य मुळातूनच अभ्यासव्यासारखे आहे. त्याने सत्याचा योग्य पक्ष घेताना त्याची कारणमीमांसा करतानाच कौरवांना त्यांच्या चुका सुधारण्याची संधीही देऊ केली होती. शिशुपालाचा वध करण्याआधीही त्याचे 100 अपराध कृष्णाने पोटात घातले होते. समोर स्वत:चे आप्त दिसल्याने युद्धभूमीत अस्वस्थ झालेल्या अर्जुनाला समजावतानाच 'मी युद्धात शस्त्र धरणार नाही' हा स्वत: केलेला 'पण' ही तो मोडण्यास तयार झाला.

सांदिपनींच्या आश्रमात शिक्षण घेताना इतरांप्रमाणेच त्यांनी गुरुगृही काम केले व शेवटही एका सामान्य माणसाप्रमाणे मृत्यू पत्करून आपले अवतार कार्य संपवले. त्यामुळेच तो देव की मानव या वादात अडकण्यापेक्षा त्याने दिलेली शिकवण अंगिकारली तर आपला 'नारायण' व्हायला उशीर होणार नाही.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने या क्षेत्रांमध्ये फायदे होतात, रविवारला विशेष महत्त्व

संकष्टी चतुर्थी: गणपतीला अर्पण करा या ३ गोष्टी, विघ्ने दूर होण्याची मान्यता

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी करा आरती सूर्याची जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

पुढील लेख
Show comments