रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 7 ऑगस्ट 2019 (11:22 IST)

सुषमा स्वराज यांच्या निधनाने लालकृष्ण आडवाणी भावूक

देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने देशात शोकमय वातावरण झाले अहो. त्याच्या निधनानंतर अनेकांनी आपली आदरांजली वाहिली. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी हेदेखील सुषमा स्वराज यांच्या निधनाच्या वृत्ताने भावूक झाले आहेत. सुषमा स्वराज यांच्या जाण्याने देशासह आपलेदेखील वैयक्‍तिक नुकसान झाले असून आपल्या सर्वात जवळच्या सहकाऱ्याला आपण गमावले असल्याच्या भावना त्यांनी व्यक्‍त केल्या आहेत. 
 
सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर लालकृष्ण आडवणी यांनी एक शोकसंदेश जारी केला त्यात त्यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या आहेत. सुषमाजींच्या जाण्याने आपण स्तब्ध झालो आहोत. त्या अशा एकमेव नेत्या होत्या ज्या भाजपच्या सुरूवातीच्या काळापासून पक्षासाठी काम करत होत्या. ज्यावेळी आपण भाजप अध्यक्ष म्हणून काम करत होतो त्यावेळी सुषमा स्वराज युवा नेत्या म्हणून आपणच त्यांना पक्षात सहभागी करून घेतले होते अशा भावना यावेळी आडवणी यांनी व्यक्‍त केल्या आहेत.