मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑगस्ट 2019 (09:04 IST)

मला नेहमीच मोठ्या बहिणीचं प्रेम दिल : गडकरी

ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे भाजपाचे खासदार आणि रस्ते वाहतूक - महामार्ग मंत्री नितीन गडकरी भावुक झाले. ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त करताना नितीन गडकरी यांनी सुषमा स्वराज यांना आपल्या 'मोठी बहिण' तसंच 'राजकीय मार्गदर्शक' म्हटलंय.
 
'श्रीमती सुषमा स्वराज यांच्या निधनानं मला मोठा धक्का बसलाय. त्यांनी नेहमीच मला मोठ्या बहिणीचं प्रेम दिलं. संघटनात्मक सल्ले देत त्यांनी राजकीय मार्गदर्शकाची भूमिकाही पार पाडली' असं म्हणत नितीन गडकरी भावूक झाले.भारतीय राजकारणात मजबूत विरोधी नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांची भूमिका नेहमीच लक्षात राहील. त्यांच्या निधनानं देशाचं, पक्षाचं आणि व्यक्तीगत माझी मोठी हानी झालीय. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, ॐ शांती' असं म्हणत त्यांनी सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिलीय.