सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

उभ्या आयुष्यात टोल बंद होऊ शकत नाही - नितीन गडकरी

"चांगल्या सुविधा हव्या असतील, तर टोलसाठी पैसे मोजावेच लागतील," असं विधान केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.  
 
टोल वसुलीवरून लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, "ज्या भागातल्या जनतेची टोल देण्याची क्षमता आहे, त्या भागातच टोल वसुली केली जाते. टोलच्या पैशांतून ग्रामीण आणि डोंगराळ भागात रस्ते बांधले जातात. 5 वर्षांत 40 हजार किलोमीटर लांबीचे राज्यमार्ग तयार करण्यात आले.
 
"पण आता सरकारकडे विकासकामांसाठी पैसा नाही. चांगले रस्ते हवे असतील तर टोल द्यावाच लागेल. टोल कधीच बंद होऊ शकणार नाही. गरजेनुसार, त्यात थोडाफार बदल होऊ शकतो."
 
दरम्यान, यापुढे शहिदांच्या कुटुंबीयांना 1 कोटींची मदत देण्याचा निर्णय फडणवीस सरकारनं घेतला आहे.
 
"सीमारेषेवर लढताना अथवा युद्धजन्य परिस्थितीत शत्रुशी सामना करताना हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीद जवानाच्या कुटुंबीयास राज्य सरकारकडून 1 कोटींची मदत दिली जाणार आहे. तसंच जखमी जवानांनाही 20 ते 60 लाखांपर्यंत मदत केली जाईल. राज्य सरकारनं याबाबतचा निर्णय घेतला आहे," अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना दिली आहे.