शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 1 ऑगस्ट 2019 (15:39 IST)

पुन्हा एकदा नितीन गडकरी यांना आली भोवळ, प्रकृती ठीक

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा भोवळ आली. सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात समारोपावेळी राष्ट्रगीत सुरु असताना गडकरींना भोवळ आली. राष्ट्रगीत सुरू असताना नितीन गडकरी खाली बसले आणि पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांना भोवळ आली. यावेळी मंचावर सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते. दरम्यान, नितीन गडकरी यांना सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात भोवळ आल्यानंतर त्यांना तातडीने कुलगुरुंच्या निवास्थानी विश्रांतीसाठी नेण्यात आलं. तिथे थोडावेळ थांबून ते नागपूरकडे रवाना झाले. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून विश्रांतीसाठी नागपूरकडे रवाना झाले. गडकरींची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचे नियोजित सर्व दौरे रद्द करण्यात आले आहेत.  सोलापूर, सांगली येथे त्यांचे दौरे नियोजित होते, ते रद्द करण्यात आले.
 
याआधी नगरमधील राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान चक्कर आल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 7 डिसेंबर 2018 रोजी राहुरीत त्यांना चक्कर आली होती. त्यावेळीही राष्ट्रगीत सुरु असताना गडकरींना अचानक चक्कर आली होती, त्यावेळी तिथे उपस्थित असलेले राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांना सावरले होते.