मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. कारगिल विजय दिवस
Written By

Kargil Vijay Diwas ऑपरेशन विजय

Kargil Vijay Diwas
भारत 2023 मध्ये कारगिल विजय दिवसाचा 24 वा स्मृतिदिन साजरा करत आहे. दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. 1999 मध्ये पाकिस्तानी सेनाने लडाखमधील उत्तर कारगिल जिल्ह्याच्या पर्वत शिखरावर कब्जा केला होता त्या युद्धात भारताची पाकिस्तानवर मिळवलेला विजयाच्या आठवणीमध्ये हा दिन साजर करण्यात येतो.
 
1971 चे भारत-पाक युद्धापासून अनेक सशस्त्र संघर्ष झाले. 90 च्या दशकात पण दोघी देशांमध्ये काश्मीर मुद्द्यावर खूप तणाव वाढला. तर दोन्ही देशांनी परमाणू परीक्षण देखील केले. परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी दोन्ही देशांनी फेब्रुवारी 1999 मध्ये लाहोर जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली आणि काश्मीर मुद्द्यावर शांततापूर्ण आणि द्विपक्षीय समाधान देण्याचे वचन दिले.
 
कारगिल युद्धात भारतीय लष्कराने "ऑपरेशन विजय" ह्याखाली पाकिस्तानी घुसखोरांना बाहेर काढलं. पाकिस्तानी घुसखोरांनी 'टायगर हिल्स' आणि भारतीय नियंत्रण रेषेचे (एलओसी) आणखीन इतर सैन्य ठिकाण्यानं ताब्यात घेतलं होतं. हे युद्ध 8 मे 1999 ते 26 जुलै 1999 दरम्यान नियंत्रण रेषेवर लढले गेले. लडाखच्या कारगिल क्षेत्रात झालेले हे युद्ध 60 दिवसांपेक्षा जास्त काळ चालले आणि देशाने 500 पेक्षा अधिक सैनिक गमावले.
 
1998 - 1999 साली पाकिस्तानी सैन्याचे काही लोकं गुप्तपणे प्रशिक्षण घेत होते आणि पाकिस्तानी सैन्य आणि निमलष्करी दलला भारतीय नियंत्रण रेषेपार पाठवत होते. त्यांनी ह्याला "ऑपरेशन बद्र" नाव दिलं. 
 
ह्या मिशनमागे पाकिस्तानचा मुख्य उद्देश्य काश्मीर आणि लडाख मधील संपर्क तोडणे आणि भारतीय सैन्याला सियाचीन ग्लेशियर हुन हटवणे असे होते. ह्याप्रकारे तो भारताला काश्मीर वादावर करार करण्यासाठी दबाव बनवण्याची तयारी करत होता.
 
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या अवैध चौक्या यशस्वीपणे नष्ट केल्या आणि 26 जुलै रोजी भारताने पाकिस्तानी सैन्याला आपल्या भूमीतून बाहेर काढले. या ऑपेरेशनला अंमलात आणताना पाकिस्तानी लष्कराच्या अवैध सैन्याला बाहेर काढण्यासाठी भारतीय हवाई दलाने भारतीय लष्कर दळाशी हातमिळवणी केली.
 
सुरुवातीला पाकिस्तानने युद्धात आपला सहभाग नाकारला आणि काश्मिरी लोकांना दोष दिला, पण नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि पाकिस्तानचे तत्कालीन लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्या वक्तव्याने त्यांच्या सहभागाचे संकेत मिळाले.
 
हा दिवस कारगिल युद्ध कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो आणि युद्धादरम्यान देशाची सेवा करताना प्राण गमावलेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भारताचे पंतप्रधान दरवर्षी इंडिया गेटवर अमर जवान ज्योती येथे श्रद्धांजली अर्पण करतात. सर्व लोकं त्यांच्या बलिदानाला आठवण करून त्यांना नमन करतात.