शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक इतिहास
Written By
Last Modified: बीड , सोमवार, 25 मार्च 2019 (10:11 IST)

विनायक मेटेंना पंकजा मुंडेंचा धक्का

Pankaja Mundane
घटक पक्ष म्हणून राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसंग्राम पक्षाने बीड जिल्ह्यात कायम भाजपपासून दोन हात अंतर ठेवले आहे. अगदी बीड लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे काम करणार नाही, असा पवित्रा विनायक मेटे यांनी घेतला आहे. त्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात एक आणि बाहेर एक असे करता येणार नाही, असा अल्टीमेटम दिला होता.
 
मात्र आता मेटे यांना पंकजा मुंडे यांनी जोरदार धक्का दिला आहे. 
 
बीड जिल्हा परिषदेमध्ये विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाचे एकूण चार सदस्य निवडून आले होते. त्यातील एक यापूर्वीच भाजपाच्या मांडवाखाली आला आहे. आता आणखी दोन म्हणजे विजयकांत मुंडे आणि अशोक लोढा या दोन जिल्हा परिषद सदस्यांनी पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
 
शिवसंग्राम पक्षाचा प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना विनायक मेटेंपासून दूर करण्यात यापूर्वीच पंकजा मुंडेंना यश आले होते. आता उर्वरित दोन जिल्हा परिषद सदस्य भाजपात घेऊन पंकजा मुंडेंनी विनायक मेटे यांना चेकमेट केले आहे.