1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By

भाजपची ४१ स्टार प्रचारकांची यादी तयार

loksabha election 2019
राज्यात निवडणुकीत प्रचारासाठी भाजपाने ४१ स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे. मोठ्या सभेपासून ते छोट्या सभागृहातील सभा असे भाजपाच्या प्रचाराचे सूत्र असेल. 
 
स्टार प्रचारकांमध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह, लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ, सुषमा स्वराज, शिवराज सिंह, मुख्तार अब्बास नक्वी, मुरली मनोहर जोशी, नितीन गडकरी, पीयूष गोयल या केंद्रीय नेत्यांसह राज्यातील माधव भंडारी, राम शिंदे, गिरीश महाजन अशा ४१ प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकीतील स्थानिक राजकारण, जातीय समीकरणे, विरोधी पक्षांचे उमेदवार अशा विविध गोष्टी लक्षात घेऊन ही प्रचारकांची फौज मैदानात उतरणार आहे.