विकासाचा ढोल बडवला, त्या दाभडीचाही विकास नाही, ग्रामस्थांकडून मतदानावर बहिष्काराचा इशारा
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी #दाभडी गावातून देशभरातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा बिगुल फुंकला होता. पाच वर्षांत या गावात नावालाही विकास झालेला नाही. इथले ग्रामस्थ भाजपाच्या भंपकगिरीला इतके वैतागले आहेत की त्यांनी कोणताही विकास न झाल्यामुळे थेट मतदानावर बहिष्काराचीच घोषणा केली आहे.
२०१४मध्ये नरेंद्र मोदी यांनी दाभडीमध्ये ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात सॅटेलाईटद्वारे २३ राज्यांतील शेतकऱ्यांशी एकाच वेळी संवाद साधला. भाजपाचे सरकार आल्यास अच्छेदिनयेतील असे आश्वासन त्यांना दिले. प्रत्यक्षात शेतकरी तर सोडाच, दाभडी गावालाही ‘अच्छे दिन’ आलेले नाहीत. त्यामुळेच थेट मतदानावरच बहिष्कार घालण्याची भूमिका मांडण्यात आली आहे.
#दाभडी देवस्थान ते गाव जोडणारा पूल नादुरुस्त आहे. पाच वर्षांत त्याची साधी दुरुस्तीही होऊ शकलेली नाही, हा गावकऱ्यांच्या रोषाचा प्रमुख मुद्दा आहे. या पुलाबाबत चंद्रपूरचे खासदार तथा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यामार्फत प्रयत्न करण्यात आले. पाठपुरावाही झाला, पण कशाचाच उपयोग झाला नाही. त्यामुळे बहिष्काराचे हे पाऊल उचलण्यात आले आहे. देशभरातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अशी संतापाची लाट आहे. तरीही सारंकाही नीटनेटकं असल्याचा आव मोदी आणि भाजपाकडून आणला जातो आहे. अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस ने सोशल मिडीयावर केली आहे.