गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 11 मे 2019 (09:54 IST)

भाजप मोदी केंद्रित पक्ष नाही : गडकरी

आमचा पक्ष कधीच व्यक्तिकेंद्रित होणार नाही, भाजप वाजपेयी किंवा अडवाणींचा पक्ष झाला नाही. तो केवळ अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांचा पक्ष होणार नाही. असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
 
भाजप कधीच व्यक्तिकेंद्रीत नव्हता आणि होणारही नाही. कारण तो विचारधारेवर आधारलेला आहे. तो तसा होईल, ही चुकीची कल्पना आहे, असे गडकरी यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. भाजप आणि मोदी किंवा भाजप आणि पक्षाचे नेते हे परस्परांना पूरक आहेत, असेही मत त्यांनी व्यक्तकेले.