बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मे 2019 (10:06 IST)

'हिंमत असल्यास राजीव गांधींच्या नावे निवडणूक लढवून दाखवा'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा वाद शमलेला नसतानाच त्यांनी पुन्हा एकदा राजीव गांधींवर टीका केली आहे.  
 
"लोकसभेचे पाच टप्पे पूर्ण झाले आहे. आणखी दोन टप्पे उरले आहेत. ज्या माजी पंतप्रधानांवर बोफोर्सच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांच्या नावावर निवडणूक लढवण्याचं मी त्यांना आव्हान देतो," असं मोदी झारखंडमधल्या चाईबासामध्ये झालेल्या एका सभेत बोलताना म्हणाले.
 
देशाला पुन्हा एकदा स्थैर्याची आणि एका प्रभावी सरकारची गरज आहे, असंही ते म्हणाले. त्याचप्रमाणे देशाला रिमोटवर चालणाऱ्या पंतप्रधानांची गरज नाही, असं म्हणत मनमोहनसिंग यांच्यावर निशाणा साधला.