बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 18 एप्रिल 2019 (10:29 IST)

डी. एल. कराड यांना तडीपारीची नोटीस

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामगार नेते तथा सीटूचे नेते डॉ. डी. एल. कराड यांना नाशिक शहर पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे. डॉ. कराड यांच्यावर मारहाणीसह विविध गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून कोणतीही सुधारणा होत नसल्याचे कारण देत पोलिसांनी त्यांना गुरुवारी, १८ एप्रिलला नोटीस पाठवत खुलासा मागवला आहे. 
 
निवडणूक प्रचारात विरोधी पक्षाचे नुकसान करण्याच्या हेतून मुख्यमंत्री व युती सरकारने कारस्थान केले आहे. मी तीनवेळा निवडणूक लढलो आहे. त्यावेळी एकही नोटीस आलेली नाही. नोटीस पाठवून सरकार दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. कामगार चळवळ चालवू नका, कामगारांच्या मागण्यासाठी मोर्चे काढू नका, आवाज बुलंद करू नका, यासाठीच ही हद्दपारीची नोटीस आहे.