बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मार्च 2019 (08:38 IST)

किरीट सोमय्या यांना अवघड शिवसेनेचे राऊत लढवणार त्यांच्या विरोधात निवडणूक

लोकसभा निवडणुक लढवता यावी यासाठी किरीट सोमय्यांकडून मातोश्रीवर  मनधरणीचे करण्याचे  प्रयत्न सुरू आहेत. शिवसैनिकांचा रोष असलेले सोमय्यांकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.  मात्र अद्याप मातोश्रीवरुन त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेली नाही. लोकसभा निवडणूक जवळ येत असताना, प्रचाराचे दिवस फार  कमी  होत आहेत, ईशान्य मुंबईचे खासदार असलेल्या किरीट सोमय्या यांना तर आता मोठा  धक्का बसला आहे.
 
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं असून, जर भाजपने सोमय्यांना तिकीट दिले तर त्यांच्याविरोधात निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचं सुनिल राऊत यांनी  स्पष्ट केले आहे. जर  वेळ पडल्यास मी अपक्ष लढेन. पण मी सोमय्यांविरोधात 100 टक्के निवडणूक लढवणार,' असा निर्धार राऊत यांनी बोलून दाखवला. त्यामुळे किरीट सोमय्यांना निवडणूक लढवणे अवघड होणार आहे. राऊत यांनी निवडणूक लढवणार असे सांगितले तेव्हा शिवसेने तर्फे मात्र त्यांना कोणताही विरोध दिसून येत नाहीय त्यामुळे सोमय्या यांना उद्धव ठाकरे यांच्यावरील टीका भोवणार आहे.