शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Updated : मंगळवार, 23 एप्रिल 2019 (10:53 IST)

मनसेकडून गाजर विवाह, भाजपवर टीका

Maharashtra Navnirman Sena
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे. विशेष म्हणजे गाजर विवाह या संकल्पनेतून एक लग्नसोहळा आयोजित करण्यात आला आहे. नवी मुंबईतीलमनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांनी या लग्नाची पत्रिका आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली आहे. 
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई आयोजित चि. चौकीदार व चि. सौ. का. थापाबाई ह्यांचा गाजर विवाहसोहळा आयोजित करण्यात येत आहे. खोट्या आश्वासन कृपेने 29 एप्रिल रोजी 56 इंचाच्या मुहूर्तावर हा सोहळा होणार असून जॅकेटवाला फुगा, विनोदी मंत्री, पिस्तुलधारी गिऱ्या हे  येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतील, असे म्हणत भाजपाच्या मंत्र्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे.