बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 18 मे 2019 (10:55 IST)

मोदींकडे प्रश्नांची उत्तरे नाहीत पत्रकार परिषदेवरून राष्ट्रवादीची टीका

परिषदेला संबोधित केले, मात्र या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. मोदींच्या या भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोदींचा चांगलाच समाचार घेतला. मोदींची पत्रकार परिषद म्हणजे फक्त मन की बात होती असा टोला मलिक यांनी मोदींना लगावला.
 
पुढे बोलताना ते म्हणाले की, आज पाच वर्षांत पहिल्यांदा नरेंद्र मोदींनी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेत मोदींनी फक्त मन की बात केली. नरेंद्र मोदींनी संबोधन केल्यानंतर जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारले असता सर्वच प्रश्नांची उत्तर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दिली. “पक्षाचे अध्यक्ष असताना मी बोलू शकत नाही”असं म्हणत मोदींनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळलं. मोदींच्या या वर्तवणुकीवरून स्पष्ट होतं की नरेंद्र मोदींकडे प्रश्नाची उत्तरच नाहीत.