'म्हणून' आजोबांसाठी पदाचा राजीनामा देणार
लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमधून निवडून आलेले जनता दल युनायटेडचे एकमेव विजयी उमेदवार प्रज्ज्वल रेवण्णा हे आपल्या आजोबांसाठी पदाचा राजीनामा देणार आहेत. प्रज्ज्वल हे जनता दल युनायटेडचे सर्वेसर्वा एच.डी. देवेगौडा यांचे नातू आहेत. कर्नाटकच्या हसन मतदारसंघातून ते विजयी झाले होते.
राजकारणात पदार्पण करणाऱ्या आपल्या नातवासाठी देवेगौडा यांनी हसन हा स्वत:चा पारंपरिक मतदारसंघ सोडला होता. त्याऐवजी ते शेजारच्या तुमकुरू या मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले होते. मात्र, भाजपच्या झंझावातापुढे त्यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे देवेगौडा यांचे लोकसभेत जाण्याचे स्वप्न भंगले होते.