शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: बारामती , शुक्रवार, 24 मे 2019 (10:07 IST)

बारामतीत कोमजले कमळ

supriya sule in Baramati
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. विजयाची हॅट्ट्रिक नोंदवताना त्यांनी 1 लाख 54 हजारां पेक्षा अधिक मताधिक्‍य मिळविले आहे. 2014च्या निवडणुकीपेक्षा दुपटीने मताधिक्‍य मिळवल्याने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याचा देशात बोलबाला झाला आहे. त्यामुळे भाजप देशाच्या कानाकोपऱ्यात विजयोत्सव साजरा करत असला, तरी बारामतीत मात्र भाजपाचे कमळ कोमेजले आहे.