संजोग वाघेरे यांचा राजीनामा

sanjog
पिंपरी| Last Modified गुरूवार, 23 मे 2019 (18:14 IST)
मावळ लोकसभा मतदार संघात पार्थ पवार यांचा पराभव होताच राजकीय उलथा-पालथ सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा दिला आहे.
मावळ लोकसभा मतदार संघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा अपवाद वगळता अख्खे पवार कुटुंबिय पार्थ यांच्या प्रचारासाठी मावळात तळ ठोकून होते. अजित पवार यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी तब्बल दोन लाखांच्या मताधिक्क्याने पार्थ यांचा पराभव केला.
पार्थ यांच्या पराभवाचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. पराभवाची जबाबदारी स्वीकारत संजोग वाघेरे यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. संजोग वाघेरे म्हणाले की, इतका दुर्देवी पराभव होईल, असे वाटले नाही. मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. काम करुनही मिळालेले अपयश धक्कादायक आहे. इतका दारुण पराभव होईल, असे वाटत नाही. आजचा निकाल आश्चर्यकारक आहे. इव्हीएम बाबत गडबड असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची जाहीर माफी मागितली

अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची जाहीर माफी मागितली
समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची सोशल मीडियावरून जाहीर माफी ...

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी कोकणात फिरायला चला

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी कोकणात फिरायला चला
उन्हाळी सुट्टी निमित्ताने कोकण रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेच्या ७८ उन्हाळी विशेष रेल्वे ...

शिवभोजन थाळीच्या संख्येत दुप्पट वाढ

शिवभोजन थाळीच्या संख्येत दुप्पट वाढ
शिवभोजन योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने या योजनेचा विस्तार करण्याच्या सूचना ...

तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, शिवप्रतिष्ठानचा इशारा

तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, शिवप्रतिष्ठानचा  इशारा
किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या वादात आता शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनीही उडी घेतली ...

'म्हणून' भारतात पॅरासिटामॉलच्या किंमतीत ४० टक्के वाढ

'म्हणून' भारतात पॅरासिटामॉलच्या किंमतीत ४० टक्के वाढ
चीनमध्ये करोना विषाणूचे पडसाद आता भारतात जाणवत आहेत.चीनमधुन पुरवठा खंडीत झाल्याने भारतात ...