1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Updated : शुक्रवार, 10 मे 2019 (16:27 IST)

आता भुजबळ यांनीही बंदोबस्त वाढवला

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अंबड इथल्या मतमोजणी केंद्रावर राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनीही आपला बंदोबस्त वाढवला आहे. त्यांनी तीन प्रतिनिधींची नेमणूक करत ईव्हीएम योग्य ठिकाणी ठेवलेले आहेत की नाही तसंच त्यांच्या प्रवेशद्वारांची सातत्याने पाहणी करण्यात येत आहे. याआधी अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी आपली २४ तास खासगी सुरक्षा व्यवस्था नेमली आहे. सरकारी सुरक्षेवर विश्वास नसल्याचा दावा करत ही सुरक्षा व्यवस्था नेमण्यात आली आहे. यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे परवानगी घेण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रात अशी खासगी सुरक्षा नेमण्याचा प्रकार नाशिकमध्ये प्रथमच करण्यात आला आहे.