सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By

घ्या, समीर भुजबळ यांच्या आईचे नाव भायखळा मतदान यादीत

नाशिकच्या मतदार यादीतून गहाळ झालेले समीर भुजबळ यांच्या आईचे हिराबाई भुजबळ हे नाव भायखळा येथील मतदान यादीत आढळून आलेले आहे. हा मतदार यादीतील घोटाळा असल्याचा आरोप भुजबळ कुटुंबियांनी निवडणूक आयोगावर केला होता.

भुजबळांच्या आरोपानंतर निवडणूक विभागाने केलेल्या चौकशीत भायखळा यादीत त्यांचे नाव दिसून आले. पण कोणता घोटाळा नसून जाणिवपूर्क करण्यात आल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे.

लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यापूर्वी भुजबळ कुटुंबीयांनी समीर भुजबळ, छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ या तिघांची नावे नाशिकच्या यादीत देण्याविषयीचा अर्ज केला होता. त्यानुसार ही तीनही नावे नाशिकमध्ये समाविष्ट करण्यात आली मात्र इतर सर्व नावे ही भायखळ्यात होती.