1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 एप्रिल 2019 (08:35 IST)

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भावाची त्यांच्यावर जोरदार टीका

राधाकृष्ण विखे पाटील जेव्हापासून विरोधीपक्षनेते झाले तेव्हा पासून त्यांचे भाजपाशी साटंलोटं असल्याचा आरोप त्यांचे बंधू अशोक विखे पाटील यांनी केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे प्रवरा मेडिकल ट्रस्टचे उपाध्यक्ष आहेत या ट्रस्ट ला २०१३-१४ मध्ये दोन कोटी रुपये डोनेशन मिळाले. डोनेशन त्यांना झाकीर नाईक नावाच्या अतिरेक्याकडून मिळाल्याचा गौप्य स्फोट राधाकृष्ण् विखे पाटील यांचे बंधू डॉ अशोक विखे पाटील यांनी केला आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याच सख्या भावाने हे खळबळजनक आरोप केल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी जोरदार शक्यता आहे. तर त्यांचे पुत्र सुजय हे    लोकसभा तिकिटासाठी आगोदरच भाजपा मध्ये गेले आहे. त्यामुळे विखे यांच्यावर जोरदार टीका होत आहे. सोबतच राष्ट्रवादीचे नेते  शरद पवार यांनी सुद्धा विखे यांच्या विरोधात दंड थोपाटले असून आता जर विखे भाजपात गेले तर त्यांचा हा निर्णय मोठा ठरणार आहे. यामध्ये कॉंग्रेसचे नगरमध्ये नुकसान होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या अहमदनगर येथील सभेत विखे पाटील भाजपा प्रवेश करण्याची शक्यता आहे.