रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Updated : सोमवार, 11 मार्च 2019 (10:31 IST)

तीन चार दिवसात लोकसभा निवडणुक, सज्ज रहा – शरद पवार

लोकसभा निवडणुकीचा  पूर्ण कार्यक्रम येणाऱ्या सात किंवा आठ रोजी जाहीर होण्याची दाट शक्यता असून, यामुळे आपण सर्वांनी आता निवडणुकांसाठी सज्ज रहावे लागेल असा  आदेशच  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. तर पुढील महिन्यात एप्रिलमधील  तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल, असं पवार यांनी अंदाज व्यक्त केला आहे.
 
चोपडा लॉन्स, गंगापूर रोड, नाशिक येथे नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, आ. हेमंत टकले, पंकज भुजबळ, नरहरी झिरवाळ, माजी आमदार जयवंतराव जाधव, डॉ.अपूर्व हिरे, जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड आदी उपस्थित होते.
 
शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की ,लोसासभा निवडणुकी तारखेला तुम्ही सकाळी साडेसहा वाजता मतदान केंद्रावर जाऊन मतदान यंत्राची पाहणी करुन जे बटन दाबले त्यालाच मतदान होतं की नाही याची खात्री करा, आमची निवडणूक यंत्रणेवर शंका नाही, मात्र केंद्र  व राज्य सरकारच्या भूमिकेवर शंका असल्याचं शरद पवारांनी सांगितले आहे.
 
मेळाव्यात शरद पवारांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राजकीय गरज भागविण्यासाठी भाजपने देशात जी आपत्ती आणली आहे ती घालविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर माझी शंका आहे त्यामुळे बूथ प्रमुखांनी सतर्क राहून काम करावे आणि सकाळी ती यंत्रे तपासून घेण्याची गरज आहे. कारण ज्यांचा हातात सत्ता आहे त्यांच सरकार हातातून जात असल्याने राडीचा डाव खेळणं हा भाजपचं प्रयत्न आहे. ज्या ठिकाणी भाजपची सत्ता होती ती राज्य भाजपच्या हातातून गेली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा परिवर्तन होणारच असे यावेळी सांगितले.