मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 25 मार्च 2019 (17:16 IST)

उर्मिला मातोंडकर यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी ?

Urmila Mantondkar
उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचं नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे. उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी भाजपचे तगडे उमेदवार असून त्यांच्याविरोधात एखादा लोकप्रिय आणि ग्लॅमरस चेहरा देण्याची काँग्रेसचा प्रयत्न आहे.

२००४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे राम नाईक यांचा अभिनेते गोविंदा यांनी पराभव केला होता. हा इतिहास लक्षात घेता. ग्लॅमरस चेहरा दिला तर उत्तर मुंबईत चमत्कार होऊ शकतो अशी आशा काँग्रेसला आहे.  येत्या दोन तीन दिवसात मातोंडकर यांचा काँग्रेसमध्ये होणार प्रवेश होण्याची शक्यता असून त्यांची अधिकृत उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे.