दत्तक घेतलेले गाव सुधारू शकले नाही ते देश काय सुधारणार?
पंतप्रधानांनी जे गाव दत्तक घेतलं तिथे नाले ओसंडून वाहत आहेत, प्यायचं पाणी शुद्ध नाही, ग्रामपंचायतीचं कार्यालय नाही, कॉलेज नाही, धड रस्ते नाहीत, गावात नाल्याचं पाणी वाहतंय, गावात रोगराई पसरली आहे. मोदींनी दत्तक घेतलेलं गाव सुधारू शकलं नाही ते देश काय सुधारणार? असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारयात्रेत तुफान गर्दी होत आहे, असा दावा भाजपच्या आयटी सेलने केला, पण जेव्हा त्या सत्यतेचा शोध एका वृत्तवाहिनीने घेतला त्यावेळेस लक्षात आलं की भाजपच्या आयटीसेलने अटलजींच्या अंत्ययात्रेतील फुटेज आणि फोटो वापरले, यावर भाजप का बोलत नाही, अशी थेट विचारणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.