शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 11 डिसेंबर 2019 (10:01 IST)

मोदी यांना ट्विटरवरकडून 2019 मधील गोल्डन पुरस्कार

ट्विटरने वर्ष 2019 मधील ट्रेंड्स जाहीर केले आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक लाईक, कमेंट आणि रिट्वीट होणाऱ्या ट्वीटचा समावेश आहे. तसेच ट्विटरने इमोजींची लिस्टही जाहीर केली आहे. ज्याचा भारतीयांनी सर्वाधिक वेळा वापर केला आहे. ट्विटरने राजकीय, मनोरंजनसहीत अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील ट्रेंडही जाहीर केले आहेत. या सर्वांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरकडून 2019 मधील गोल्डन पुरस्कार  मिळाला आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यावर #VijayiBharat या हॅशटॅगसह 23 मे रोजी एक ट्वीट केले होते. मोदींच्या या ट्वीटला 2019 चा गोल्डन ट्वीट पुरस्कार  मिळाला आहे. या ट्वीटला आतापर्यंत 117.6 हजार लोकांनी रिट्वीट केले. तसेच 420.6 हजार लोकांनी लाईक केले.मुंबई : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने वर्ष 2019 मधील ट्रेंड्स जाहीर केले आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक लाईक, कमेंट आणि रिट्वीट होणाऱ्या ट्वीटचा समावेश आहे. तसेच ट्विटरने इमोजींची लिस्टही जाहीर केली आहे. ज्याचा भारतीयांनी सर्वाधिक वेळा वापर केला आहे.