शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (16:53 IST)

फर्टाडोज स्कूल ऑफ म्युझिक ने आयएएन फंडच्या साह्याने केली २० करोड रुपयांची गुंतवणूक

निधीच्या फेऱ्यांमध्ये डीएसजी ग्राहक भागीदार देखील सहभागी होते.

देशातील अग्रगण्य संगीत संस्थांपैकी एक असलेल्या फर्टाडोस स्कूल ऑफ म्युझिकने (एफएसएम) आयएएन फंड आणि डीएसजी ग्राहक भागीदारांकडून २० करोडचा निधी मिळविला आहे. ह्या गुंतवणुकीमुळे एफएसएमला पुढील वाढीसाठी मदत होईल, देशातील मुख्य शहरांमध्ये शाखा उभारण्यास, अधिक मुलांपर्यंत पोचण्यासाठी तसेच, दर्जेदार संगीत शिक्षण उपलब्ध करण्याचा उद्देश पूर्ण करण्यास खूप मदत होणार आहे.

या धोरणां बद्दल बोलताना फर्टाडोज स्कूल ऑफ म्युझिकच्या सह-मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक तनुजा गोम्स म्हणाल्या, “आम्ही गुणवत्तापूर्ण संगीत शिक्षण प्रत्येक तरुण - वृद्ध व्यक्तीपर्यंत पोहोचण्या योग्य व्हावे या उद्देशाने एफएसएमची सुरुवात केली. आज आम्ही १४ शहरांमध्ये ६० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना संगीत शिक्षण देत आहोत. आम्ही आता आमचा व्यवसाय वाढवून ५ लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू इच्छित आहोत.”

त्यासंबंधी अधिक माहिती देताना, फर्टाडोज स्कूल ऑफ म्युझिकचे को-सीईओ आणि सह-संस्थापक धारिणी उपाध्याय म्हणाल्या, “आम्ही देशात दर्जेदार संगीत शिक्षणाची ओळख करुन देणारे अग्रगण्य संस्था आहोत आणि एफएसएम अभिमानाने संगीताचे अंगीकरण वाढविण्यासाठी उत्प्रेरक आहे. भारतातील शाळा आणि घरे प्रत्येक गोष्टीच्या मध्यभागी एज टेक्नॉलॉजी कटिंग आहे जे उत्कृष्ट ग्राहक अनुभव आणि गुणवत्तेसह सक्षम करते. आम्हाला इतर विषयांप्रमाणे शालेय शिक्षणाचा अविभाज्य भाग म्हणून संगीत शिक्षण देण्याची आमची इच्छा आहे.”

या घोषणेवर भाष्य करताना आयएएन फंडाचे संस्थापक भागीदार पद्मजा रुपारेल म्हणाल्या, “भारतीयांच्या वाढत्या आकांक्षेमुळे संगीत शिक्षण नक्कीच वाढत आहे. एफएसएम दर्जेदार संगीत शिक्षण देन्यासयोबत महत्वाकांक्षी आणि वाढणार्‍या ग्राहकांची पूर्तता करतो आणि आम्ही एफएसएमसाठी तनुजा आणि धारिनीच्या महत्वाकांक्षी योजनांमुळे खूप उत्साही आहोत. ”