रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 जानेवारी 2023 (13:18 IST)

मुलाच्या मृत्यू नंतर 70 वर्षाच्या सासऱ्याने केलं सुनेशी लग्न

असं म्हणतात की लग्नगाठ ही वरून ठरवूनच बांधली जाते. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एका 70 वर्षीय व्यक्तीने आपल्या 28 वर्षीय सुनेशी लग्न केले. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच हे अनोखे लग्न चर्चेचा विषय बनला आहे. 
सदर घटना गोरखपूर जिल्ह्यात छपिया उमराव गावाच्या बरहलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे छपिया उमराव गावातील रहिवासी कैलाश यादव (70 वर्षे) यांनी आपल्या मुलाची पत्नी पूजा (28 वर्षे) हिच्याशी मंदिरात लग्न केले. एका 70 वर्षांच्या व्यक्तीने 28 वर्षाच्या तरुणी सोबत  लग्न केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

छापिया गावात राहणारा कैलाश यादव बरहलगंज पोलिस स्टेशनचा चौकीदार आहे. त्यांच्या पत्नीचे 12 वर्षांपूर्वी निधन झाले. 
 
कैलासच्या 4 मुलांपैकी तिसरी सून पतीच्या मृत्यूनंतर आपले पुढील आयुष्य दुसरं लग्न करून काढणार होती. पण इतक्यात सासऱ्याने आपले प्रेम सुनेवर व्यक्त करून तिच्याशी लग्न करण्याची इच्छा दर्शवली. तिने होकार दिल्यावर वय आणि समाजाचे बंधन तोडून दोघांनी मंदिरात जाऊन एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. या घटनेची चर्चा सर्वत्र होत असून फोटो व्हायरल झाले आहेत.   
दोघांनी परस्पर संमतीने लग्न केल्याचे समजते. या विवाहाबाबत पोलिस किंवा प्रशासन स्तरावर कोणत्याही पक्षाच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.  
 
Edited By- Priya Dixit