मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 16 जानेवारी 2023 (14:06 IST)

Tommy-Jaily Wedding:कुत्रा आणि कुत्रीच्या लग्नात गावकरी वऱ्हाडी झाले

यूपीच्या अलीगढ मधील कुत्रा टॉमी आणि कुत्री जेलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या लग्नाला संपूर्ण गावकऱ्यानी हजेरी लावली असून . टॉमी आणि जेलीच्या लग्नात गावकरी वऱ्हाडी झाले. दोघांच्या लग्नाची मिरवणूक निघाली  मिरवणुकीत गावकरीही गाण्याच्या तालावर नाचताना दिसले. या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेचा विषय बनला आहे. 
 
खरं तर, हा अनोखा विवाह, अलिगढच्या सुखरावली गावचा माजी प्रमुख दिनेश चौधरी यांचा आठ महिन्यांचा पाळीव कुत्रा टॉमी आता विवाहबंधनात अडकला आहे. अत्रौलीतील टिकरी रायपूर येथील रहिवासी डॉ. रामप्रकाश सिंह यांच्या सात महिन्यांच्या जेली या कुत्रीशी टॉमीचे नाते जुळले होते. त्यानंतर 14 जानेवारीला दोघांचे थाटामाटात लग्न केले.
 
Edited By- Priya Dixit