शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 21 नोव्हेंबर 2018 (08:36 IST)

सलमानची कोरीयोग्राफार चालवायची सेक्स सेक्स रॅकेट

बॉलीवूड मध्ये डान्स शिकविण्याच्या नावाखाली मॉडल, स्ट्रगलिंग अॅक्ट्रेसला शरीरविक्रीसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी महिला कोरियोग्राफरला अटक केली. या कोरियोग्राफरचे अॅग्नेस हेमिल्‍टन (वय 56) असं नावं आहे. आरोपी महिला ही तरुणींना खाडी, आफ्रिकन देशात सप्लाय करत होती असे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपी महिला मुंबईत डान्स क्‍लासेस चालवत होती,  डान्स क्लासला येणार्‍या तरुणींना ती शरीरविक्रीसाठी प्रवृत्त करते असे. तर अनेकदा तिने तरुणींना खोटे सांगून कॉन्सर्टच्या नावाखाली विदेशात देखील तिने पाठविले आहे. त्यांना देहविक्री करण्यास भाग पाडत होती. पोलिसांनी आरोपी महिलेकडून अनेक आक्षेपार्ह क्लिप व दस्ताऐवजही जप्त केलेत. या प्रकरणी पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. ही महिला आरोपी बॉलिवूडचा स्टार अभिनेता सलमान खान, सुशांत सिंह राजपूत यांच्यासह अनेक अभिनेत्याला आणि अॅक्ट्रेसेसला डान्स शिकविल्याचा दावा अॅग्नेस हेमिल्टनने केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.