सोमवार, 26 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (11:11 IST)

हा फोटो पाहायलाच हवा

जगप्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा तीन महिन्यांपूर्वीच इंस्ट्राग्रामवर सक्रीय झाले आहेत. आता टाटा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका तरुणाचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे  हा फोटो स्वत: रतन टाटा यांचा असून लाँस अँजेलिस येथील आहे. 
 
82 वर्षीय टाटा यांनी वयाच्या 25 व्या वर्षी काढलेला हा फोटो आहे. टाटा यांचा हा फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. तसेच, हा फोटो पाहिल्यानंतर तुम्ही हॉलिवूड स्टार असल्याचं वाटतंय, असे म्हणत नेटीझन्सने रतन टाटा यांचं कौतुक केलंय.  
 
रतन टाटा यांनी आपल्या पोस्टवर एस मेसेजही लिहिला आहे. हा फोटो ''मी बुधवारीचा शेअर करणार होतो. पण, कुणीतरी मला 'थ्रोबैक थर्सडे’ बद्दल सांगितले. म्हणून, हा लॉस अँजेलिसमधील फोटो शेअर केला'', असे रतना टाटा यांनी फोटोला कॅप्शन दिले आहे.