मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

वर्ल्ड इकोनॉमिक फोरमकडून दीपिकाला पुरस्कार

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला जागतिक आर्थिक मंचाच्या (वर्ल्ड इकोनॉमिक फोरम) क्रिस्टल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दावोस येथे पार पडलेला हा यंदाचा २६ वा क्रिस्टल पुरस्कार सोहळा होता. मानसिक आरोग्याच्या जनजागृतीसाठी दीपिकाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.  

कधीकाळी इतर लोकांप्रमाणेच मी देखील नैराश्याच्या गर्तेत सापडले होते. दररोज सकाळी उठल्यावर मी का जगतेय हा एकच विचार माझ्या मनात सुरु असायचा. मानसिक आरोग्याविषयी जागरूकता नसल्यामुळे अशी वेळ माझ्यावर आली होती. परंतु त्यानंतर जाणीवपूर्वक प्रयत्न करुन मी नैराश्यावर अखेर मात केली. यातून बाहेर आल्यावर असे काहीतरी करायचे ज्यामुळे कमीत कमी एकाचे तरी प्राण वाचेल असा निर्धार मी केला होता. त्याप्रमाणे संस्थेच्या माध्यमातून डिप्रेशनविषयी जनजागृती करायला सुरुवात केली” अशा आशयाचे भाषण करुन दीपिकाने आपल्या भावना व्यक्त केल्या.