मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 मार्च 2018 (10:42 IST)

'प्लेबॉय'नेही फेसबुकला सोडचिठ्ठी दिली

आता जगातील सुप्रसिद्ध मासिक असलेल्या 'प्लेबॉय'नेही फेसबुकला सोडचिठ्ठी दिली आहे. फेसबुक हे सेक्सला जखडून ठेवत आहे. सेक्स हा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्याचा जगभरात चाहता वर्ग आहे, असे असतानाही या महत्त्वपूर्ण विषयाकडे फेसबुक दुर्लक्ष करत असल्याचा प्लेबॉयचा आरोप आहे.

 

फेसबुक सोडताना 'प्लेबॉय'चे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर कूपर हेफ्नर यांनी म्हटले आहे की, फेसबुकची साधने, दिसानिर्देश आणि कॉर्पोरेट निती आमच्या मुल्यांवर विपरीत परिणाम करते आहे. आम्ही या मद्दयावरून आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचे म्हणने आहे की, फेसबुक सेक्ससारख्या महत्त्वाच्या विषयाला दुर्लक्ष करते आणि बांधूनही ठेवतो. प्लेबॉययने फेसबुक सोडणे ही खूप मोठी गोष्ट मानली जात आहे. कारण, प्लेबॉययला येणारे सर्वाधिक ट्रॅफीक हे फेसबुकवरूनच येत असे. दरम्यान, प्लेबॉय हा पहिल्यापासूच लैंगिकता, सेन्सॉरशिप आणि वाईट बातम्यांविरोधात आवाज उठविण्यासाठी ओळखला जातो. १०६०च्या दशकात प्लेबॉयने वर्णद्वेशाविरूद्ध पुढे येत कामही केले होते. प्लेबॉयने फेसबुक सोडण्याचा निर्णय तेव्हा घेतला आहे.