गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (12:26 IST)

नवरदेवाला घेऊन घोडा फरार झाला Funny Wedding Video

Funny Wedding Video
सध्या देशात लग्नाचा मोसम सुरू आहे. सोशल मीडियावरही लग्नाचे मजेदार व्हिडिओ शेअर केले जात आहेत. यातील काही व्हिडिओ असे आहेत की ते हसून हसून लोटपट होऊन जातात. त्याच वेळी, असे काही व्हिडिओ आहेत जे आश्चर्यचकित करणारे आहेत. अशात एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुमचे हसू थांबवता येणार नाही. कारण, विधी सुरू असताना अचानक घोडी नवरदेवाला घेऊन पळून गेली. हा नजारा पाहिल्यानंतर उपस्थित लोकांनाही हसू आवरता आले नाही. आता हा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे.
 
प्रत्येक लग्नात काहीतरी ना काही नक्कीच घडते, ज्याच्या चर्चा रंगतात. कधी वधू-वरांची चर्चा होते, तर कधी केवळ पाहुणे मंडळीच लुटतात. आता हा व्हायरल व्हिडिओ पाहा, वर कसा आनंदाने घोडीवर बसला आहे. त्याचबरोबर खाटेवर असलेल्या घोडीला चारा दिला जात आहे. अचानक फटाक्यांचा आवाज ऐकून घोडी बिदकते आणि वरासह पळू लागते. आधी घोडी पुढे जाणे थांबवेल असे लोकांना वाटते, पण ती वरासोबत पळ काढते. हे पाहून लोक आश्चर्यचकित होऊन घोडीच्या मागे धावतात. पहा मजेदार व्हिडिओ...
 
व्हिडिओ 37 लाखाहून अधिक लोकांनी बघितला
व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही विचार करत असाल की वराच्या नशिबी काय आहे? आता या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोक या व्हिडिओवर जोरदार चर्चा होत आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर 'ghantaa' नावाने शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 37 लाखांहून अधिक लोकांनी हा मजेदार व्हिडिओ पाहिला आहे आणि व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रियांचा आनंद घेत आहेत.