बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मार्च 2021 (12:52 IST)

या महिलेनं फेसबुकवर पोस्ट केला टॉयलेटमधला कमोडवर बसलेला फोटो... कारण जाणून घ्या

टॉयलेटचा दरवाजा अर्धा उघडा असून कमोडवर एक महिला बसल्याचा फोटो महिलेने शेअर केला आणि सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागली. तिने असा फोटो का बरं पोस्ट केला असावा यावर अनेक मत व्यक्त होत आहे. 
 
आता कारण जाणून घ्या
गीता यथार्थ भारतीय माहिती आणि प्रसारण खात्यात कार्यरत आहे. त्या सिंगल पेरेंट आहेत. त्यांनी टॉयलेटचं दार अर्ध उघड ठेवत कमोडवर बसलेला फोटो शेअर करत लिहिले आहे की 'मी टॉयलेटचं दार शेवटी कधी बंद केलं होता, मला आठवत नाही. आता तर अशी परिस्थिती आहे, की ऑफिसमध्येही टॉयलेटचं दार बंद करणं लक्षात राहत नाही. आणि आता मुलाने फोटो काढणे शिकून घेतले आहे. लाइफ ऑफ द सिंगल मदर. पुढं त्यांनी लिहिलं आहे, 'मदरहूड हा सोपा जॉब नाही, दैवीय पण नाही. म्हणून त्याचं उदात्तीकरण थांबवा.' 
 
 
गीता यांच्या या पोस्टवर काही असभ्य भाषेतील कमेंट्रस केले जात आहे तर काही लोकांना आपल्या अशाच प्रकाराच्या समस्या मांडल्या आहेत. 
(Facebook photo by Geeta Yatharth)