रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019 (09:52 IST)

मोदींना मिळालेल्या भेटवस्तूचा दुसऱ्यांदा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेहमीच मोठ्या संख्येने भेटवस्तू मिळत असतात. आता या भेटवस्तूंचा दुसऱ्यांदा लिलाव करण्यात येत आहे. लिलावात या भेटवस्तूंची किंमत २०० रुपयांपासून ते २ लाख ५० हजार रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. गेल्या ६ महिन्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचे ई-ऑक्शन करण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात पंतप्रधानांना दिलेल्या भेटवस्तूंचा लिलाव करण्यात आला होता.
 
या भेटवस्तूंची संख्या २ हजार ७७२ आहे. या भेटवस्तूंचे ई-ऑक्शन १४ सप्टेंबरपासून सुरु होणार असून ३ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांनी औपचारिक उद्घाटन केलं. ई-ऑक्शनमध्ये भेटवस्तूंवर अधिकाधिक बोली लावणाऱ्याला ती भेटवस्तू देण्यात येईल. भेटवस्तूंमधून मिळालेल्या पैशांचा उपयोग नमामि गंगे या प्रोजेक्टसाठी करण्यात येणार आहे.
 
या भेटवस्तूंमध्ये एक गणपतीची मूर्ती आहे. या मूर्तीची किंमत २०० रुपये ठेवण्यात आली आहे. तर बनारसच्या विणकरांद्वारा करण्यात आलेल्या एका पेटींगची किंमत २ लाख ५० हजार ठेवण्यात आली आहे.